esakal | राज्यातील जिम चालकांवर आली उपासमारीची वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Gym-Workout

...पण परवानगी द्या
आम्हाला कडक नियम लावा, अटी-शर्ती लागू करा. परंतु, जिम चालू करण्यास परवानगी द्या. आम्ही त्या नियमांचे काटेकोर पद्धतीने पालन करू, अशी मागणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

राज्यातील जिम चालकांवर आली उपासमारीची वेळ

sakal_logo
By
सागर शिंगटे

पिंपरी - राज्यात सुमारे १५ हजार जिम, फिटनेस आणि हेल्थ क्‍लब आहेत. त्यातील ५ ते १० टक्के जिम दिवाळखोरीत आले असून, त्यांची विक्री सुरू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फिटनेस क्षेत्रावर बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. काही जिम चालक, प्रशिक्षक, कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने प्रसंगी कडक नियम आणि अटी-शर्ती घालून जिम चालू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनने (आयबीबीएफएफ) केली आहे.

पुणे- पेठांमधील एका वॉर्डमध्ये किती पाऊस पडतो, त्याचे अचूक मोजमाप करणे आता शक्‍य

पुणे जिल्ह्यात सुमारे एक हजार जिम असून राज्यात जिम, फिटनेस आणि हेल्थ क्‍लबची संख्या सुमारे १५ हजार आहे. बहुतेक जिम चालक हे मध्यमवर्गीय आहेत. उत्पन्न बंद असताना बॅंकेचे हप्ते, प्रशिक्षकांचे वेतन, यात फारशी कपात झालेली नाही. त्यामुळे आता फिटनेस इंडस्ट्री मोडकळीस येऊ पाहत आहे. याबाबत आयबीबीएफएफचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे म्हणाले, ‘‘राज्यात ५ ते १० नामवंत साखळी प्रकारात मोडणाऱ्या व्यावसायिक जिम सोडल्यास उर्वरित सुमारे ९० टक्के जिम हार्डकोअर आहेत. या जिम चालकांना दरमहा किमान १५ ते २० हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत जागेचे भाडे द्यावे लागत आहे.’’

किरण राज यादव बारामती नगरपालिकेचे नवे मुख्याधिकारी

जागामालक भाडे कमी करीत नाहीत. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नव्हते. त्यांना केवळ महिन्याचे किराणा धान्य भरून दिले आहे. सरकारने भाडे, जीएसटी आणि वीजबिल माफ करावे.
- राजेश इरले, जिमचालक, पिंपळे सौदागर

"आइन्स्टाईन'च्या सिद्धांताची झाली परीक्षा; गुरुत्वीय लहरींचा अभ्यास

मसल्स उतरले; डाएटही बिघडले
पुणे - सकाळी किंवा संध्याकाळी नियमित जिमला जायचे. रोजचा योग्य डाएट घ्यायचा. बॉडीबिल्डिंग किंवा चांगल्या आरोग्यासाठी सर्व गोष्टी तंतोतंत पाळायच्या, हे व्यायाम करणाऱ्यांना नित्याचेच. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांचे हे सर्व रुटीन बिघडले असून, तीन महिन्यांपूर्वी अगदी परफेक्‍ट बॉडी असलेल्यांचे मसल्स आता उतरले असून, डाएटही बिघडले आहे.

खा. डॉ कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; आता वाढणार कोरोना चाचण्यांची संख्या

लॉकडाउनमुळे काही जण सध्या घरीच वर्कआउट करीत आहेत. मात्र, सर्व प्रकारचे व्यायाम घरी करणे शक्‍य नसल्याने बॉडीबिल्डरांचा बॉडीशेप बदलला आहे. व्यवस्थित व्यायाम व डाएट नसल्याने वजनही वाढले आहे. याबाबत मिस्टर युनिव्हर्स अजित थोपटे सांगतात, की व्यायाम बंद असल्याने स्थूलपणा वाढत आहे. त्याचा परिणाम रोग प्रतिकारक्षमतेवर होत आहे. योग्य प्रोटिन घेतले, तरी घरी बसून ते पचविणे शक्‍य नसते. त्याचा परिणाम मसल्स आणि त्वचेवर होतो. वर्कआउट सुरू असेल तर रक्ताभिसरण आणि पचनक्रिया सुरळीत सुरू असते.

काम मिळत नव्हते, जवळ पैसे नाही, म्हणून कुटुंबाने मारली विहिरीत उडी; पण...

रोजच्या व्यायामामुळे बॉडीचा रुटीन ठरलेला असतो. मात्र, आता तो पूर्ण थांबला आहे. डाएट, व्यायामासह इतर आवश्‍यक बाबींवर मोठा खर्च करून बॉडी बनवली जाते. ती पूर्ण बॉडी आता अगदी शून्यावर सुद्धा येऊ शकते. बॉडीबिल्डिंगच्या ऑनलाइन स्पर्धा सुरू झाल्या आहेत. ज्या शहरांमध्ये जिम खुल्या करण्यात आल्या आहेत तेथील बिल्डर पुण्यातील बिल्डरांच्या तुलनेत पुढे असणार. मी नवीन जिममध्ये व्यायाम सुरू केला होता. एका महिन्यातच लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे व्यायामदेखील थांबला आहे.