Shivsena Row : उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का! कसबा-चिंचवड निवडणुकीपर्यंतचं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena Row

Shivsena Row : उद्धव ठाकरेंना आणखी मोठा धक्का! कसबा-चिंचवड निवडणुकीपर्यंतचं...

Shivsena Row : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दिवसांपासून उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरील हक्कावरून काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू होता.  

दरम्यान काल (शुक्रवार) निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे नाव आणि पक्षाचे चिन्ह हिसकावण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि शिवसेनेचे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे.

उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरे गटाला मिळालेले ताप्तुरते मशाल चिन्ह आणि पक्षाचे नाव आता फक्त कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीपर्यंत आहे. "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव देखील ठाकरेंना पोटनिवडणुकीतपर्यंत वापरता येणार आहे. निवडणुकीच्या ऑर्डरमध्ये हे लिहण्यात आले आहे. 

२६ फेब्रुवारीनंतर उद्धव ठाकरे यांना नाव वापरता येणार नाही. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा निवडणूक आयोगात जाणार आहे. आयोगाने चिन्ह आणि पक्षाचे नाव नियमित करावे, अशी मागणी ठाकरे गट करणार आहे. 

यावर उल्हास बापट म्हणाले, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्टे आणला. तर दोन्ही गटाला त्यांचे आधिचे पक्ष आणि चिन्ह नियमित राहतील. 

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray