तमिळनाडूची अनुकृती ठरली "मिस इंडिया'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - तमिळनाडूची अनुकृती वास ही देशातील सर्वांत सुंदर युवती ठरली आहे. "फेमिना मिस इंडिया 2018'चा मुकुट तमिळनाडूच्या अनुकृती वास हिला बहाल करण्यात आला. 29 प्रतिस्पर्धींवर मात करून अनुकृतीने ही स्पर्धा जिंकली. मुंबईत मंगळवारी (ता. 19) रात्री ही स्पर्धा झाली.

गेल्या वर्षीची "मिस इंडिया' मानुशी छिल्लरने तिच्या डोक्‍यावर विजेतेपदाचा मुकुट चढविला. हरियानाची मीनाक्षी चौधरी ही फर्स्ट रनर अप ठरली, तर आंध्र प्रदेशची श्रेया राव ही तिसरी आली. चेन्नईच्या लॉयला महाविद्यालयात शिकणारी अनुकृती 19 वर्षांची आहे. माजी क्रिकटपटू इरफान पठाण, के. एल. राहुल व अभिनेता बॉबी देओल, मलाईका अरोरा, कुणाल कपूर परीक्षकांच्या भूमिकेत होते.

Web Title: anukruti vas miss india