चिंता वाढली! १८ जिल्ह्यांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस; पावसाच्या ओढीने जवळपास ४८ लाख हेक्टरवरील पिके तहानली

राज्यातील एक कोटी ३६ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली. सुरवातीला पावसाने ओढ दिली, पण ८ जुलैनंतर पाऊस पडला आणि पेरण वाढली. परंतु, आता दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने १८ जिल्ह्यांमधील अंदाजे ४८ लाख हेक्टरवरील पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
sakal-exclusive
sakal-exclusivesakal

सोलापूर : राज्यातील एक कोटी ३६ लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. सुरवातीला पावसाने ओढ दिली, पण ८ जुलैनंतर पाऊस पडला आणि पेरणीचे क्षेत्र वाढले. परंतु, आता पुन्हा दहा दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने १८ जिल्ह्यांमधील अंदाजे ४८ लाख हेक्टरवरील पिकांना सध्या पाण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी विभागाने आता पिकस्थितीचा अहवाल मागविला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के, नांदेड ११३ टक्के, हिंगोली ८५ टक्के, अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात ११३ टक्के, वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा ८७ टक्के पाऊस झाला आहे. उर्वरित १८ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ३५ ते ४० टक्के पाऊस कमी झाला आहे. राज्यातील भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी कळमोडी, येडगाव, डिंभे, चासकमान, वडीवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, वरसगाव, निरा देवघर, वीर, भाटघर ही धरणे वगळता नाझरे, गुंजवणी, टेमघर, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, वडज, घोड, विसापूर, टेमघर ही धरणे ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेली नाहीत.

उजनी धरण अद्याप १३.२२ टक्क्यांवरच थांबलेले आहे. पावसाचा नेमका अंदाज लक्षात येत नसल्याने अद्याप त्या धरणांमधून पाणी सोडलेले नाही. पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जात आहे. परंतु, खडकाळ, हलक्या जमिनीसह कोरडवाहू जमिनींवरील पिके पाण्याअभावी माना टाकत असल्याची वस्तुस्थिती आहे. आता आगामी आठ दिवसांत पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.

१८ जिल्ह्यांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढणा, बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या १८ जिल्ह्यांमध्ये १ जून ते १४ ऑगस्टपर्यंत सरासरीच्या तुलनेत केवळ ६० ते ६८ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सोयाबीन, मका, तूर, उडीद, मटकी अशी पिके माना टाकत असल्याची स्थिती आहे.

राज्यातील खरीपाची स्थिती

  • एकूण क्षेत्र

  • १.४२ कोटी हेक्टर

  • पेरणी झालेले क्षेत्र

  • १.३६ कोटी हेक्टर

  • अपेक्षित सरासरी पाऊस

  • ६६७.७ मिलीमीटर

  • पडलेला सरासरी पाऊस

  • ६११.९

  • पावसाअभावी धोक्यातील पिके

  • ४८ लाख हेक्टर

विभागनिहाय पावसाची सरासरी

  • कोकण : १११ टक्के

  • नाशिक : ६६ टक्के

  • अमरावती : ८९ टक्के

  • पुणे : ६५ टक्के

  • छत्रपती संभाजीनगर : ८३ टक्के

  • नागपूर : ९१ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com