ncp
ncpesakal

APMC Election Result: राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी गड राखले; बाजार समितीत दमदार कामगिरी

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर झाले आहेत. बाजार समित्यांसाठी शुक्रवारी निवडणुक पार पडली होती. निवडणुकीचा शनिवारी निकाल जाहीर झाला आहे. यात अनेकांना धक्का बसला यामध्ये सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा समावेश आहे. तर शिवसेना-भाजपला शेतकऱ्यांनी नाकारल्याचे काहीसे चित्र पाहिला मिळत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा सर्वात जास्त बाजार समित्यांवर फडकला आहे.

बाजार समित्यांच्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला त्या पाठोपाठ भाजप दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नवख्या आमदारांनी अनेक ठिकाणी भाजपच्या ताब्यात असलेल्या बाजार समित्यांना सुरूंग लावला आहे.

बीड जिल्ह्यात पुतण्याने काकांच्या ४० वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. सर्व पक्षांतील नेत्यांना एकत्र करत जयदत्त क्षीरसागर यांना आव्हान दिले होते.

बारामतीत पुन्हा अजित पवारांची सत्ता

बारामती बाजार समितीमध्ये भाजपचा सुफडा साफ झाल्याचे चित्र पाहिला मिळालं, या ठिकाणी अजित पवारांच्या नेतृत्वात लढलेल्या पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. १८ पैकी १८ जागांवर उमेदवार निवडणून आले आहेत.

पंकजा मुंडेंना पुन्हा पराभवाचा धक्का

बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, गेवराई, बीड, वडवणी, आष्टी, या बाजार समित्यांवर धनंजय मुंडे यांनी सत्ता आणली आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित करत पंकजा मुंडे यांना जबर धक्का दिला.

कर्जत बाजार समितीत शिंदे-पवारांना सामना जागा

कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीत अटीतटीच्या निवडणुकीत भाजप नेते राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या गटात चांगलीच चुरस पाहिला मिळाली. राम शिंदे याची एक हाती सत्ता असलेल्या कर्जत बाजार समितीत रोहित पवारांनी आपले ९ उमेदवार निवडणून आणले आहेत. या मुळे राम शिंदे गटाला ९ जागा आणि रोहित पवार यांच्या गटाला ९ जागा मिळाल्या आहेत.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर छगन भुजबळांचे वर्चस्व

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाने वर्चस्व राखले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी १३ जागा मिळवत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरीत पाच जागांमध्ये अपक्ष दोन आणि शिंदे गटाला तीन जागांवर विजय मिळवता आला आहे.

राहुरी बाजार समितीत तनपुरेंची सत्ता

अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या राहुरी कृषी उत्पन्ना बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे, भाजप खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले आणि यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. या निवडणुकीत तनपुरे गटाचा दणदणीत विजय झाला. तनपुरे गटाने 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवत राहुरी बाजार समितीवर 20 वर्षांपासूनची एकहाती सत्ता कायम ठेवली आहे.

आमदार नीलेश लंके यांचा भाजप खासदार सुजय विखेंना धक्का

पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी भाजप खासदार सुजय विखे यांना जोरदार धक्का दिला आहे. पारनेर बाजार समितीत १८ जागांवर विजय मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे.

इंदापूर बाजार समितीवर पुन्हा भरणे-जगदाळे गटाची सत्ता

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा सत्ता राखण्यास राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांना यश आलं आहे. दत्तात्रेय भरणे आणि माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या गटाने बाजार समितीत सत्ता मिळविली आहे.

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गटाची सत्ता

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंचर बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, यांच्या महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. या मध्ये मविआची सत्ता आली आहे.

मावळच्या एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ल्याला सुरुंग

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या बाळा भेगडेंना पुन्हा एका दे धक्का दिला आहे. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला आहे. महाविकासच्या विजयामुळे मावळचा भाजपचा बालेकिल्ला ढासळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com