लोकायुक्ताच्या मुद्यांवर झाले एकमत; आता लवकरच होणार नियुक्ती?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

- लोकायुक्त विधेयकाच्या मसुद्याबाबत झाले एकमत.

- लोकायुक्त विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येण्याची शक्यता.

पुणे : लोकायुक्त विधेयकाचा मसुदा तयार करण्यासंदर्भात
मसुद्यातील काही मुद्यांवर एकमत झाले आहे. उर्वरित काही मुद्यांवर एकमत न झाल्यामुळे आणखी एक ते दोन बैठका होतील. त्यात मसुद्याला अंतिम स्वरुप दिल्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे, अशी
माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात प्रभावी लोकायुक्त कायदा मसुदा तयार करण्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि सरकारच्या प्रतिनिधींची बैठक "यशदा' येथे बुधवारी पार पडली. दुसऱ्या दिवशी या बैठकीस अण्णा हजारे, मुख्य सचिव अजोय मेहता
यांच्यासह "लोकायुक्त अधिनियम 1971 दुरुस्तीसाठी संयुक्त मसुदा समिती'चे सदस्य माजी सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, विश्वंभर चौधरी, ऍड. शाम असावा, ऍड. संजय पठाडे तसेच अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार आणि
विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत उपस्थित होते.

सध्याच्या लोकायुक्‍त कायद्यातील काही तरतुदींसह अन्य काही मुद्यांचा समावेश करण्यावर एकमत झाले. मुख्य सचिवांनी काही मुद्यांना सहमती दर्शविली. मात्र, उर्वरित मुद्यांवर चर्चेसाठी आणखी बैठक होईल. त्यात विधेयकाच्या मसुद्याला अंतिम स्वरुप दिले जाईल. त्यानंतर हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. या बैठकीनंतर
अण्णा सायंकाळी राळेगणसिद्धीला रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of Lokayukta soon