Employment News : राज्यसेवेच्या २५० पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश

राज्यसेवेतील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले
Appointment order for 250 eligible candidates of state service education 2021
Appointment order for 250 eligible candidates of state service education 2021 esakal

पुणे : राज्यसेवेतील पात्र उमेदवारांना प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे. राज्यसेवा परीक्षा २०२१ च्या अंतिम निकालानुसार २६५ उमेदवार शिफारसप्राप्त ठरले होते. तर राज्यसेवा परीक्षा २०२० मधील सात उमेदवार तसेच एक गुणवत्ताधारक खेळाडू आणि नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे तीन पाल्य अशा एकूण २७६ उमेदवारांपैकी २६३ उमेदवार कागदपत्र तपासणीस उपस्थित होते.

त्यापैकी २५० उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाने प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्तीचा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. कागदपत्र पडताळणीअंती पात्र २५० उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी तसेच उमेदवारांच्या अन्य प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी संबंधित यंत्रणांकडून करण्यात आली आहे.

Appointment order for 250 eligible candidates of state service education 2021
Pune News : भोर मधील शिक्षक नसलेल्या शाळांसह शिक्षण विभागाला कुलूप ठोकणार - लहू शेलार

ही तपासणी आणि प्रमाणपत्रे पडताळणीचे अहवाल विचारात घेऊन २५० उमेदवारांना ३ ऑक्टोबरपासून दोन वर्षांच्या सीपीटीपी - ९ या तुकडीतील प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com