

Mahayuti Government Anniversary Sakal Survey
ESakal
महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने घेतलेल्या सर्वेक्षणात मराठी भाषेबाबत नागरिकांची भूमिका स्पष्ट दिसून आली आहे. सरकारने शाळांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी राबवलेल्या उपाययोजना किती प्रभावी ठरल्या, याबाबत विचारले असता प्रतिसाद देणाऱ्यांची मते विविध दिशांनी विभागलेली दिसली.