Arnab Cyclone Maharashtra : अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा?; महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा इशारा; २८ ते २९ ऑक्टोबर महत्त्वाचे

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अर्णब चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? २८ आणि २९ ऑक्टोबरला राज्यातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा आहे, जाणून घ्या हवामानाचा अंदाज.
Arnab Cyclone Maharashtra Weather Update

Arnab Cyclone Maharashtra Weather Update

esakal

Updated on: 

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावरही जाणवू लागला आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकणाऱ्या या चक्रीवादळामुळे २८ आणि २९ ऑक्टोबरला विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत पावसाचा अधिक प्रभाव जाणवू शकतो. काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचीही शक्यता आहे. चक्रीवादळाचा थेट तडाखा महाराष्ट्राला बसण्याचा अंदाज नसला, तरी त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com