esakal | पुन्हा गोंधळ! जिल्हा परिषदेची आरोग्य भरतीही ढकलली पुढे
sakal

बोलून बातमी शोधा

Exam Postponed

पुन्हा गोंधळ! जिल्हा परिषदेची आरोग्य भरतीही ढकलली पुढे

sakal_logo
By
सुधीर काकडे

आरोग्य विभागाच्या परिक्षा पुढे ढकलल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंरत राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारावर जोरदार टीका करताना दिसता आहेत. आरोग्य विभागाच्या परिक्षांमध्ये झालेल्या प्रकारानंतरही सरकारी नोकर भरतीचा गोंधळ सुरूच आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य भरतीही पुढं ढकलली. मार्च 2019 पासून या परिक्षांची प्रक्रिया सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरती आतापर्यंत तीनवेळा ढकलण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, लॅब तंत्रज्ञ, औषध निर्माता अशा 6000 पदांची भरती होणार आहे. विषेश म्हणजे ही भरतीप्रक्रिया त्याच न्यासा कंपनीकडे आहे, ज्या कंपनीवर आरोग्य विभागाच्या परिक्षांमध्ये झालेल्या गोंधळासाठी कारणीभुत असल्याचे आरोप लावण्यात येत आहेत. आता 17 आणि 18 ऑक्टोबर या दोन दिवशी ही परिक्षा होणार होती, मात्र रात्रीतुनच maharddzp.com या वेबसाईटवर नोंदणीच्या तारखा बदलल्याचे समजते आहे. यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसते आहे.

हेही वाचा: आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी बदलली TET ची तारीख

दरम्यान, 24 आणि 31 ऑक्टोबर ला शासनाच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात येणार असून, या दोन्ही परिक्षांसाठी लागणारी यंत्रणा एकच आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

loading image
go to top