थकीत रकमेइतकी साखर द्या - शेट्टी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

पुणे - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी किंवा पूर्ण पेमेंट देणे शक्य नसल्यास थकीत रकमेइतकी साखर शेतकऱ्यांना द्यावी, असा तोडगा काढण्याचे प्रयत्न साखर आयुक्तालयाकडून सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक कारखान्यांनीदेखील या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली.

राज्यात साडेचार हजार कोटींची एफआरपी थकल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी सोमवारी तासभर चर्चा केली. थकलेल्या पेमेंटपोटी कारखान्यांनी साखर देण्याचा तोडगा आयुक्तांकडूनच आधी चर्चेला आला होता. त्याला दुजोरा देत कारखान्यांनी शेतकऱ्यांना साखर दिल्यास स्वीकारली जाईल, असे ‘स्वाभिमानी’ने देखील मान्य केले आहे.

‘एफआरपीचे तुकडे नकोत’
एफआरपीबाबत तुमच्याशी चर्चा करणार असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जाहीर केले आहे, असे पत्रकारांनी सांगितले असता खासदार शेट्टी म्हणाले, की आम्ही सांगितलेल्या पद्धतीने चर्चा करण्यास मला आवडेल; पण एफआरपीचे तुकडे करणाऱ्या चर्चेत मला रस नाही.

Web Title: Arrears Payment Sugar Raju Shetty