'धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंना तत्काळ अटक करा'

Raj Thackeray vs Laxman Mane
Raj Thackeray vs Laxman Maneesakal
Summary

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशात फाळणी सदृश परिस्थिती निर्माण करायची आहे का?

सातारा : धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल राज ठाकरे (Raj Thackeray) यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी माजी आमदार लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून आजपासून ‘आम्ही भारतीय लोक’ हे आंदोलन सुरू केले. राज्यातील ३६ जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने हे आंदोलन केले जाणार आहे.

मशिदीवरील भोंगे उतरवले नाही, तर आम्ही तलवारी काढू, या राज ठाकरे यांच्या वक्तव्याने धार्मिक तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा पोलिसांनी दाखल करावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आवाहन केले होते. त्यांनी गुन्हा दाखल केला नाहीत, तर मी स्वतः गुन्हा दाखल करेन, असे श्री. माने यांनी म्हटले होते.

Raj Thackeray vs Laxman Mane
''भारतानं कोणत्याही देशाला, समाजाला धोका निर्माण केलेला नाही''

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशात फाळणी सदृश परिस्थिती निर्माण करायची आहे का, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी ‘आम्ही भारतीय लोक’ हे आंदोलन आजपासून सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून श्री. माने यांनी या आंदोलनाची सुरुवात केली. या वेळी त्यांनी राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचे मच्छिंद्र जाधव, प्रेमचंद साबळे, डॅनिअल खुडे, नारायण जावलीकर, मनोज कांबळे, नरेंद्र भालेकर, सुधीर पांढरे, हरी सोळंकी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com