मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

arrested a man who have threatened through fb post to kill the chief minister
arrested a man who have threatened through fb post to kill the chief minister

सातारा : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याबाबतची पोस्ट फेसबुक पेजवरून टाकणाऱ्या युवकाला मुंबई पोलिसांनी आग्रीपाडा येथे ताब्यात घेतले आहे. पंकज कुंभार (रा. मालगांव, ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. सातारा एलसीबीचे पथक कुंभारला ताब्यात घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे. 

मुख्यमंत्री उद्या (सोमवारी) खंडाळा साखर उद्योगाच्या कार्यक्रमासाठी म्हावशी (ता. खंडाळा) येथे येणार आहेत. आज (ता. 3 रविवार) सकाळी सहाच्या सुमारास पंकज कुंभार याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्यासंदर्भातील पोस्ट टाकली होती. ही पोस्ट त्याने दोनवेळा व्हायरल केली होती. यावरून खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलिस दल सक्रिय झाले.

खुद्द पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश सायबर पोलिस ठाणे व एलसीबीला दिले होते. सायबर पोलिस ठाण्याचे सहायक निरिक्षक गजानन कदम व कर्मचाऱ्यांनी पंकज कुंभार याचा माग काढला. त्याची माहिती आग्रीपाडा (मुंबई) येथील पोलिसांना दिली. त्यांनी पंकज कुंभारला ताब्यात घेतले. त्याला साताऱ्यात आणण्यासाठी एलसीबीचे पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून विविध आंदोलनात सक्रिय असलेल्या पंकज कुंभार याने अशी पोस्ट का व्हायरल केली, हे चौकशीत निष्पन्न होईल, असे पोलिसांनी नमूद केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com