कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही मिळणार वाढीव गुण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 जानेवारी 2017

मुंबई - क्रीडा क्षेत्राबरोबरच यापुढे शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत 15 ते 25 वाढीव गुण मिळणार आहेत.

मुंबई - क्रीडा क्षेत्राबरोबरच यापुढे शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलेत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत परीक्षेत 15 ते 25 वाढीव गुण मिळणार आहेत.

2018 पासून होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत वाढीव गुणांची सवलत देण्यात येणार आहे. आठवी, नववी आणि दहावीत विद्यार्थ्याने प्रयोगात्मक लोककला प्रकारातील किमान 50 प्रयोग सादर केले असल्यास, 10 अतिरिक्‍त गुण, किमान 25 प्रयोग सादर केले असल्यास त्या विद्यार्थ्यास पाच अतिरिक्‍त गुण देण्यात येतील.

लोककला सादरीकरणातील निर्मितीच्या कोणत्याही घटकामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्याला याप्रमाणेच अतिरिक्‍त गुण देण्यात यावेत, असा सरकारी आदेश नुकताच काढण्यात आला आहे.

आठवी ते दहावी या शैक्षणिक वर्षात बालनाट्य स्पर्धेत पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे 15, 10 व 5 अतिरिक्‍त गुण देण्यात येतील. पहिलीपासून शालेय स्तरावर कोणत्याही वर्षी राष्ट्रीयस्तरावर अभिनयाचा पुरस्कार मिळवणाऱ्या बाल कलाकारास 10 अतिरिक्‍त गुण व राज्यस्तरावर पुरस्कार मिळवणाऱ्या बाल कलाकारास 5 अतिरिक्‍त गुण देण्यात येणार आहेत.

Web Title: Art students will get additional marks