Fight with Corona : कोरोनाचे संकट गंभीर, दातृत्वाचे हात खंबीर!

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 एप्रिल 2020

अनेकांचे हात पाठीशी आहेत, म्हणूनच कोरोना संकट गंभीर असताना शासन खंबीरपणे उभे आहे.

मुंबई : लॉकडाउनमुळे अडकलेल्या वाशी येथील सिडकोच्या एक्झिबिशन सेंटरला भेट दिल्यावर माहिती विभागाच्या कर्मचाऱ्यांस आलेल्या अनुभवाचे वर्णन त्यांच्याच शब्दांत...

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ. गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे सिडको एक्झिबिशन सेंटरला 280 पेक्षा अधिक लोक आश्रयाला होते. 

- इंजेक्शन नाही, शास्त्रज्ञ म्हणतायत अशी असू शकते COVID19 ची लस...

सहज चौकशी केली. तेव्हा लक्षात आले. भुपेश गुप्ता हे व्यापारी आहेत. त्यांची आयऑन केबल नावाची कंपनी आहे. त्यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आणि आवश्यक ते साधनसामुग्री या लोकांना पुरविली आहे. हे केवळ एका दिवसापुरते नाही, तर 14 एप्रिल पर्यंत दोन वेळचे जेवण देण्याची त्यांची तयारी दिसून आली. माणसातले माणूसपण यातून दिसून आले.

- Video : गळा दाबला, वर्दी फाडली; जीवघेण्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला ठाणेदार!

तेथील एकाला विचारले, तो सांगू लागला. मी रामकिशन. मुळगांव बिहार येथे मी बांधकामाचे काम करतो. महाराष्ट्र शासनाने आम्हाला नुसताच निवारा नाही, तर दोन वेळेला पोटभर जेवण मिळेल याचीही सोय करून दिली. गावी आम्हाला संपर्क साधण्यासाठी फोनही उपलब्ध करून दिला जातो. मधून मधून डॉक्टरही येऊन जातात. सरकारचे खूप उपकार आमच्यावर आहेत.

- मोठी बातमी ! ठाकरे सरकार काढणार 60 हजार कोटींचे कर्ज

कोकण विभागात आजच्या तारखेला 30 हजारापेक्षा जास्त लोक 400 पेक्षा अधिक ठिकाणी राहत आहेत. शासन त्यांच्या जेवणाची सोय आणि राहण्याची सोय करीत आहे. स्वंयसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती यासाठी स्वता:हून पुढाकार घेता आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या नियोजनामुळे बेरोजगार, निवाराहीन आणि स्थलांतरीत लोकांना हक्काचा निवारा प्राप्त झाला आहे.  

- मोठी बातमी - "अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत" : राज ठाकरे

अनेकांचे हात पाठीशी आहेत म्हणूनच कोरोना संकट गंभीर असताना शासन खंबीरपणे उभे आहे. मदतीसाठी तत्पर आहे, असे वर्णन घटनास्थळावरून कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे माहिती सहायक प्रविण डोंगरदिवे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Helpers Donors who do their thankless job in lockdown situation