सुकन्येच्या ‘समृद्धी’साठी

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे भविष्य चांगले असावे, असे प्रत्येक आई-वडिलांना वाटते.
sukanya samruddhi scheme
sukanya samruddhi schemesakal

आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांचे भविष्य चांगले असावे, असे प्रत्येक आई-वडिलांना वाटते. नेमके हेच डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने खास मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी २०१५ मध्ये ‘सुकन्या समृद्धी योजना’ आणली.

या योजनेत मुलींचे पालक मुलींच्या नावाने खाते उघडू शकतात आणि त्यात मुलीच्या भविष्यासाठी दरवर्षी गुंतवणूक करू शकतात. मुलींच्या जन्मापासून ते ती मुलगी दहा वर्षांची होईपर्यंत कधीही खाते उघडता येते आणि दरवर्षी त्या खात्यात पैसे जमा करता येतात.

योजनेची वैशिष्ट्ये

  • या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक पूर्णपणे करमुक्त आहे.

  • योजनेतील गुंतवणुकीला प्राप्तिकरातून सवलत देण्यात आली आहे.

  • १ एप्रिल २०२३ पासून या योजनेसाठी ८ टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे.

  • बचत खाते उघडण्यासाठी किमान गुंतवणूक मर्यादा २५० रुपये, तर कमाल गुंतवणूक मर्यादा दीड लाख रुपये.

  • खात्यात दरवर्षी दरवेळी वेगवेगळी रक्कम टाकण्याची सोय उपलब्ध.

  • व्याजावरदेखील कर लागू नाही.

  • योजनेचा कालावधी संपल्यानंतर बचत खात्यात जमा होणाऱ्या संपूर्ण रक्कमेवरही कर लागू होत नाही.

खाते कोठे काढायचे? :

टपाल कार्यालय, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया यांसारख्या सरकारी बॅंकांच्या शाखा, निर्धारित केलेल्या राष्ट्रीयकृत खासगी बॅंकांच्या शाखा.

आवश्यक कागदपत्रे

मुलीचा जन्मदाखला, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारखी केवायसी कागदपत्रे

किती रक्कम गुंतवणूक करता येते? : किमान : प्रति वर्षी २५० रुपये (दरवर्षी), कमाल : प्रति वर्षी दीड लाख रुपये. पहिल्यांदा खाते उघडताना किमान २५० रुपये खात्यात जमा करणे आवश्यक. खात्यात दरवेळी आपल्या सोयीनुसार वेगवेगळी रक्कम खात्यात भरता येते.

मुलीचा जन्म झाल्यानंतर ते ती दहा वर्षांची होईपर्यंत तुम्ही या योजनेअंतर्गत खाते काढू शकता. खाते काढल्यानंतर खात्यात १५ वर्षे होईपर्यंत त्यात न चुकता पैसे जमा करायचे आहेत. त्यावर व्याज मिळत राहील. संबंधित खात्याला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १६ ते २१ वर्षे तुम्हाला वेगळे पैसे जमा करायचे नाहीत; पण खात्यातील रक्कमेवरील व्याज सुरूच राहील.

खात्याला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम तुमच्या बचत खात्यात जमा होईल. ही योजना लागू केली त्यावेळी योजनेला ७.६ व्याजदर लागू होता; परंतु एप्रिल २०२३ पासून या योजनेला ८ टक्के व्याजदर लागू केला आहे. हा दर तिमाहीला बदलतो.

खात्याला २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बचत खात्यात संपूर्ण रक्कम जमा होते. अपवादात्मक परिस्थितीत योजनेतील पैसे काढण्याची मुभा आहे; परंतु तरीही योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर त्या खात्याला पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणतीही रक्कम काढता येत नाही. पाच वर्षानंतरच रक्कम काही अपवादात्मक परिस्थितीत काढता येऊ शकते.

अपवादात्मक परिस्थिती -

१. मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे काढता येतात. त्यावेळी खात्यात जमा असणाऱ्या रक्कमेच्या जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम काढता येते.

२. मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी योजनेतील संपूर्ण पैसे काढतात येतात.

३. मुलीला दुदैवी आजारपण आल्यास, त्यावरील उपचारासाठी योजनेअंतर्गत खात्यातून पैसे काढतात येतात. परंतु तेही खाते काढून पाच वर्षे झाल्यानंतरच ही रक्कम काढता येते.

(संकलन - मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com