ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई - ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई - ग्रंथ निवड समितीच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील उपयुक्त ग्रंथांची निवड करून यादी करण्याचे काम ग्रंथ निवड समिती करते. समितीच्या अध्यक्ष म्हणून ढेरे आणि साहित्य संस्थांनी शिफारस केलेले शशिकांत सावंत, डॉ. रामचंद्र देखणे, श्रीपाद प्रभाकर जोशी हे सदस्य काम पाहतील. सरकारने नियुक्त केलेले अशासकीय प्रतिनिधी म्हणून पुण्याचे आनंद हर्डीकर, ठाणे सीएचएम महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष आठवले, परभणीचे सुरेश मारोतीराव जंपनगिरे, नाशिकचे नंदन रहाणे, मुंबईचे किशोर कदम, पुण्याचे डॉ. देवीदास वायदंडे, मुंबईच्या मीना वैशंपायन, नागपूरचे डॉ. कुमार शास्त्री, बदलापूरचे श्‍याम जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

याचबरोबर राज्य ग्रंथालय संघाचे विभागवार प्रतिनिधी म्हणून अमरावती विभागातून राम देशपांडे, औरंगाबाद विभागातून डी. बी. देशपांडे, नागपूर विभागातून शिवकुमार शर्मा, नाशिक विभागातून केशवराव कोतवाल, पुणे विभागातून हरिदास रणदिवे, मुंबई विभागातून उदय सबनीस काम पाहतील. उच्च शिक्षण विभागाचे संचालक हे या समितीचे सदस्य असतील; तर ग्रंथालय संचालक हे सदस्य सचिव असतील. 

Web Title: Aruna Dhere chairman of the selection committee