Aryan Khan Case - नवाब मलिक यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांचे उत्तर

Mohit Kamboj
Mohit Kamboj
Summary

आर्यन खान प्रकरणी एनसीबीच्या कारवाईवर आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले.

आर्यन खान प्रकरणी एनसीबीच्या कारवाईवर आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले. आता नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले. कंबोज यांच्या भाच्याच्या मदतीने आर्यनचे अपहरण केले आणि खंडणी मागितली असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यावर कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. तसंच नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल कऱणार असल्याचंही कंबोज यांनी म्हटलं.

सुनिल पाटील आणि सॅम डिसूझाचे काय संबंध हे त्यांनी सांगावं, मलिक सत्य लपवत असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. सुनिल पाटीलशी राष्ट्रवादीशी काय संबंध हे त्यांनी सांगावे, आरोप करणाऱ्या मलिकांविरोधात मी हायकोर्टात खटला दाखल करणार असेही कंबोज यांनी सांगितले.

मलिक यांच्या आरोपांचे स्वागत, त्यांनी सिद्ध करून दाखवावे मी त्यांच्या आरोपांचे स्वागत करतो. त्यांनी जे खोटे आरोप केले आहेत त्याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे. त्यांच्याच भाषेत उत्तर देईन असाही इशारा कंबोज यांनी दिला.

Mohit Kamboj
'वानखेडेंनी मुंबईला पाताळलोक केलं, ड्रग्जच्या नावावर हजारो कोटींची वसुली'

ललित हॉटेलचा उल्लेख करत हेड मी होतो असा त्यांचा आरोप, पण त्यांनी जे आरोप केले ते खोटे आहेत. अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीत सुनिल पाटीलचे नाव आहे. त्याने घर का सोडलं, कुलूप लावून तो कुठे गेला? असा प्रश्न विचारला. मी कधी ललित हॉटेलमध्ये पाच वर्षात गेलो असेल तर सीसीटीव्ही चेक करा असही कंबोज म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com