आर्यन खानची अटी शिथिल करण्यासाठी मुंबई HC मध्ये याचिका

28 ऑक्टोबर रोजी अटीशर्तींसह या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला होता.
Aryan Khan
Aryan KhanEsakal

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan moves HC seeking modification of bail condition) याने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. हायकोर्टाने जामीनासाठी घातलेल्या काही अटींशर्तींमध्ये शिथिलता आणावी, अशी मागणी आर्यनकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अर्जात करण्यात आली आहे.

Aryan Khan
...म्हणून सीडीएस बिपीन रावत यांना देण्यात आली 17 तोफांची सलामी

आर्यनसह अरबाज आणि मुनमुन धमेचाच्यावतीनं सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी 28 ऑक्टोबर रोजी कठोर अटीशर्तींसह या तिघांना जामीन मंजूर केला होता. (Mumbai High Court Grant Bail to Aryan Khan )त्यातील एका अटीनुसार, आर्यनला एनसीबीच्या मुंबईतील (Mumbai NCB Office) कार्यालयात दर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले होते.

या अटीमध्ये शिथिलता देण्याची मागणी आर्यन खानकडून शुक्रवारी दाखल करण्यात आलेल्या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. या अर्जावर पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे, असे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com