Video: इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून चक्क शहरात फिरवली, व्हिडीओ व्हायरल | Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

Video: इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून चक्क शहरात फिरवली, व्हिडीओ व्हायरल

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींना कंटाळून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) किंवा कार खरेदी करत आहेत त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ आहे. अनेक इलेक्ट्रिक कंपन्यांनी त्यांच्या दुचाकी व चारचाकी सादर केल्या आहेत. (as company ignoring complaints Beed man tied electric bike to donkey and driven around town video goes viral)

हेही वाचा: संजय राऊतांवरील सुनावणीवरून हायकोर्टाने बार असोसिएशनला फटकारलं

अनेक ठिकाणी या इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागल्याच्या घटना समोर येत आहे. अशातच इलेक्ट्रिक बाईक बंद पडल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीने इलेक्ट्रिक बाईक गाढवाला बांधून चक्क शहरात फिरवून अनोखे आंदोलन केले. सध्या या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

हेही वाचा: संजय राऊतांवरील सुनावणीवरून हायकोर्टाने बार असोसिएशनला फटकारलं

हा व्हिडीओ राज्यातील बीड जिल्ह्यातील आहे. बीडच्या परळी येथे एका व्यक्तीने नवीन विकत घेतलेली इलेक्ट्रिक बाईक बंद पडली. बंद पडलेल्या नव्या बाईकची कंपनीकडे वारंवार तक्रार करूनही कंपनीकडून दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या बाईकच्या मालकाने इलेक्ट्रिक बाईक चक्क गाढवाला बांधून शहरात फिरवून अनोखे आंदोलन केले. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मिडिया वर धुमाकूळ घालतोय

Web Title: As Company Ignoring Complaints Beed Man Tied Electric Bike To Donkey And Driven Around Town Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top