Asha Bhosale distances herself from politics amid Thackeray brothers' Marathi language protest call : मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून तीव्र विरोध होत आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात येत्या ५ जुलै रोजी दोन्ही पक्षांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.