अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नीच्या अडचणीत वाढ: 'त्या' प्रकरणात सत्र न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार

Asha Gawli has no relief from the Sessions Court in the financial misappropriation case
Asha Gawli has no relief from the Sessions Court in the financial misappropriation caseesakal

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची पत्नी आशा गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या दोषमुक्त अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.(Asha Gawli has no relief from the Sessions Court in the financial misappropriation case)

अरुण गवळी याच्या अखिल भारतीय कामगार सेनेसह अरुण गवळी आणि आशा गवळी यांच्याविरुद्ध मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत २००६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या आरोपातून दोषमुक्त करण्यास आशा गवळीला न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आशा गवळीच्या अडचणीत भर पडली आहे.

Asha Gawli has no relief from the Sessions Court in the financial misappropriation case
विधान परिषदेवर नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न उच्च न्यायालयात; राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

नेमकं काय आहे प्रकरण?

ग्लोब ऑटो इलेक्ट्रिकल्स आणि त्यांचे ४६९ कर्मचारी यांच्यातील हा वाद आहे. १९८१मध्ये ही कंपनी बंद पडल्यानंतर या कामगारांना कमी करण्यात आले. अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेना या पक्षाच्या अखिल भारतीय कामगार सेनेला या कामगारांच्या वतीने खटला चालविण्याची परवानगी देण्यात आली.

Asha Gawli has no relief from the Sessions Court in the financial misappropriation case
CMच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी कसरत; अंगणवडी सेविकांना हजर राहण्याचे सरकारी आदेश

ग्लोब ऑटो इलेक्टिकल कंपनीच्या कामगाराची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत २००६ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी आशा गवळीने न्यायदंडाधिकारी न्यायालयात मुक्ततेसाठी याचिका दाखल केली होती, मात्र न्यायालयाने ती फेटाळल्यानंतर आशा गवळीने सत्र न्यायालयात गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी धाव घेतली होती परंतु सत्र न्यायालयाने तिला दोषमुक्त करण्यास नकार दिला आहे.

सत्र न्यायालयाने आशा गवळींना दोष मुक्तीच्या अर्जाला विरोध करत, तपासात रेकॉर्डवरील पुराव्यावरुन असे सिद्ध होते की १५० बेअरर चे वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तयार करण्यात आले होते. त्या धनादेशांवर आरोपी क्रमांक १ अरुण गवळी आणि आरोपी क्रमांक २ आशा गवळी यांच्या स्वाक्षरी होत्या.

Asha Gawli has no relief from the Sessions Court in the financial misappropriation case
Sharad Pawar : शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड

त्याद्वारे ते धनादेश अखिल भारतीय सेनेच्या कर्मचाऱ्यांमार्फत रोखण्यात आले आणि बँकेतून काढलेली रक्कम आरोपी क्रमांकला १ ला देण्यात आली. ती रक्काम कर्मचाऱ्यांनी वितरित करणे आवश्यक होती असे नरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com