esakal | ‘आषाढी वारी’ बंदोबस्ताला असलेले सहा पोलिस कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

‘आषाढी वारी’ बंदोबस्ताला असलेले सहा पोलिस पॉझिटिव्ह

‘आषाढी वारी’ बंदोबस्ताला असलेले सहा पोलिस पॉझिटिव्ह

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

पंढरपूर : संतांच्या वचनावर विश्वास ठेवून शेकडो वर्षांपासून लाखो भक्त पंढरपूरची वारी करीत असतात. मात्र, मागच्या वर्षीपासून ते शक्य होत नाही आहे. कोरोनामुळे मोजक्याच लोकांना व पालख्यांना पंढरपुरात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. यंदाही कोरोनामुळे पंढरपूरला तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. काल व आज केलेल्या कोरोना चाचणीत यातील पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. (Ashadhi-War-coronavirus-Police-corona-positive-pandharpur-news-nad86)

विठ्ठलाच्या दर्शनासाठी दरवर्षी वारकरी पंढरपूरला निघत असतात. एकप्रकारे ते या दिवसाची वाटच पाहत असतात. अनेक तीर्थक्षेत्रावरून, गावागावांवरून पायदळ दिंड्या जात असतात. काही लोक आपआपल्या परीने वाहनाने जातात व तिथे जाऊन चंद्रभागेचे स्नान, हरीकथेचे श्रवण, नगर प्रदक्षिणा, संतांच्या गाठीभेटी करून प्रेमानंद लुटत असतात. भक्तीप्रेमाने न्हावून निघत असतात. मात्र, मागच्या वर्षी देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून भक्तांची ही इच्छा पूर्ण होत नाही आहे.

हेही वाचा: हवामान तज्ज्ञांनी पावसाबाबत दिले संकेत; चिंता वाढणार की कमी होणार?

कोरोना वाढू नये म्हणून प्रशासनाने कडक निर्बंध लावून दिले आहे. यामुळे मोजक्याच नागरिकांना व दिंड्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात येत आहे. परवानगीशिवाय कोणीही पंढरपुरात येऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास तीन हजार पोलिसांना येथे तैनात करण्यात आले आहे. दोन दिवसांत तीन हजार पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. रविवारी आलेल्या अहवालात पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी ही तपासणी करण्यात येत आहे

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

आषाढी वारीसाठी बंदोबस्ताला आलेल्या सर्व पोलिसांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. दोन दिवस चाललेल्या चाचण्यांमध्ये पाच पोलिसांसह एका होमगार्डचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेल्या पोलिसांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
- अतुल झेंडे, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर

(Ashadhi-War-coronavirus-Police-corona-positive-pandharpur-news-nad86)

loading image