'जन्मापूर्वीचा इतिहास शिवसेनेचे इतिहासाचार्य संजय राऊतांना माहिती नसावा' | Ashish Shelar Comment On Sanjay Raut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay-Raut-Ashish-Shelar

'जन्मापूर्वीचा इतिहास शिवसेनेचे इतिहासाचार्य संजय राऊतांना माहिती नसावा'

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील वाक् युद्ध संपायला तयार नसल्याचे दिसत आहे. शिवसेना जन्म सन १९६६ साली झाला. तर शिवसेनेचे इतिहासाचार्य खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जन्म सन १९६१ साली झाला. त्यामुळे जन्मापुर्वीचा इतिहास इतिहासाचार्यांना माहिती नसावा म्हणून सांगतो, असा टोला भाजप (BJP) आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज मंगळवारी (ता.२५) लगावला आहे. (Ashish Shelar Attack On Shiv Sena Leader Sanjay Raut Over History)

हेही वाचा: काँग्रेसला न्याय मिळत नाही, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांची खंत

पुढे आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, आमचे दोन नगरसेवक श्री.कानिटकर आणि कोरडे हे १९५७ साली मुंबईत निवडून आले. तर सन १९६७ ला हशु अडवाणी चेंबूरमधून विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. तुमचे पहिले आमदार वामनराव महाडिक १९७० साली परळमधून जे निवडून आले तेही आमच्या पाठींब्यावर. त्यामुळे उगाच सोईने इतिहास उगळू नका, असा सल्ला शेलार यांनी राऊत यांना दिला. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत हिंदुत्ववाच्या विचारांसाठी युतीत 'आम्ही गर्व से कहो' म्हणत होतो.

हेही वाचा: उत्तर भारतात तेव्हा सेनेची लाट होती, आमचा पंतप्रधान झाला असता - संजय राऊत

आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shiv Sena) मात्र या जाज्वल्य इतिहासाच्या फुलांचे निर्माल्य झाले वाटतेय! इतिहासाला अर्थ केवढा जाच्यात्याच्या समजूती एवढा!, या शब्दांत इतिहासावरुन त्यांनी राऊतांचा समाचार घेतला.

Web Title: Ashish Shelar Attack On Shiv Sena Leader Sanjay Raut Over History

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..