esakal | 'पटोले, वडेट्टीवर आणि भुजबळ तिघेही रावणतोंडी, त्यांनी तोंड दाखवू नये'
sakal

बोलून बातमी शोधा

wadettiwar patole bhujbal

'पटोले, वडेट्टीवर, भुजबळ हे रावणतोंडी, त्यांनी तोंड दाखवू नये'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (local bodies election) पुढे ढकलता येणार नाही, असा निकाल दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्याच दिवशी निवडणुका घोषित करून राज्य सरकारला दणका दिला. आता ओबीसी आरक्षणाशिवाय पाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यावरून भाजपचे (BJP) नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. आता भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ या तिन्ही ओबीसी नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

हेही वाचा: अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

इतर राज्यात ओबीसी आरक्षण कायम आहे. पण, फक्त महाराष्ट्रातील OBC आरक्षण का गेलं? कारण रावण तोंडी वक्तव्याने नुकसान केलं आहे. ठाकरे सरकारने दोन वर्षांत न्यायालयात आपली बाजू व्यवस्थित मांडली नाही. आयोग तयार करायला उशिर लावला आणि न्यायालयात बाजू मांडायला असमर्थ ठरले, अशी टीका शेलार यांनी केली.

भाजपने सातत्याने राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने इम्पिरिकल डेटा मागितला त्यावर काम करायला पाहिजे. पण, यांनी जीआर टिकवला नाही. न्यायालयात बाजू मांडू शकले नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण गेले. नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि भुजबळ हे रावणतोंडी आहेत. ओबीसी आरक्षण गेले त्यामागे हेच रावणतोंडी आहेत, अशी जोरदार टीका शेलार यांनी केली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण अतिरिक्त ठरवित रद्द केले होते. त्यानंतर राज्य सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यास सांगितले. त्यानुसार आयोग तयार करण्यात आला. मात्र, अद्यापही ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारवर आरोप केले जात आहेत. ओबीसी आरक्षणाच्या बाबतील राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांकडे चेंडू टोलवित असल्याचाही आरोप होतो आहे.

loading image
go to top