सुप्रिया सुळेंचा अभ्यास कच्चा अन् डोक्यतील राजकारण वेगळं; शेलारांचा हल्लाबोल

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष महाराष्ट्रद्रोही - शेलार
Political
Politicalesakal
Summary

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष महाराष्ट्रद्रोही - आशिष शेलार

पंतप्रधानांच्या लोकसभेतील भाषणाचे पडसाद सध्या राजकीय वातावरणात उमटताना दिसत आहेत. दरम्यान, यातील काही मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चागंलीच शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर (Congress) सडकून टीका केली. महाराष्ट्रातील (Maharashtra) मजूर बाकीच्या राज्यांमध्ये गेल्याने कोरोना वाढला असं ते म्हणाले. त्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं होतं.

दरम्यान, आता या सगळ्या वादात भाजपचे (BJP Aashish Shelar) आशिष शेलार यांनी उडी घेतली असून त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा अभ्यास कच्चा असून त्यांच्या डोक्यात एक राजकारण आहे. राज्यातले हे निर्दयी सरकार आहे. आमचा रिक्षावाला टॅक्सीवाला याचा एक रुपया मिळलेला नाही यावर बोला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ते म्हणाले, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सुपर स्पेडर आहेत असं मोदी म्हणाले ते खरं आहे. वांद्रेमध्ये आपण तेच पाहिले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (NCP) हे तीन पक्ष महाराष्ट्रद्रोही आहेत. सुप्रिया सुळे आणि संजय राऊत तुमचा पक्ष चीनचा हस्तक म्हणून काम करत होता का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे शेलार म्हणाले, गरिबाला रस्त्यावर आणून त्याची फसवणूक करून त्याला अन्य राज्यात जाण्यासाठी परावृत्त केले. तुम्ही चीनचे हस्तक म्हणून काम केले आहे का? सुप्रिया सुळे तुमचा अभ्यास कच्चा आहे. तुम्हाला राज्यातील जनेतेची काळजी असती, तर 60 हजार पेपर कोर्टात गेले नसते. केंद्र सरकारने (Central Govt.) रेल्वेने पाठवण्याआधी तुमचा अनधिकृत कार्यक्रम का सुरू होता. या तिन्ही पक्षावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणीही शेलार यांनी केली आहे.

यावेळी नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, नमस्ते ट्रम्पमुळे पसार झाला नाही. परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर कार्यक्रम ठरवता येतो. गुजरातपेक्षा राज्याचे आकडे का वाढलेत याचा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी विचार करावा. हे सर्व पाप या तीन पक्षाचे आहे. त्यांनी कोरोनाचे (Covid -19) आकडे लपवले आहेत. मृत्यूचा दर खोटा सांगितला असून कोरोना लसीही पळवल्या आहेत असे गंभीर आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com