महाराष्ट्रातील नेत्यांनी CM योगींचा क्लास लावावा, शेलारांचा सल्ला

भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार
MLA Ashish Shelar
MLA Ashish Shelare sakal
Summary

भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार

राज्यातील राजकीय वातावरणात हल्ली अनेक घटना मोठ्या वेगाने घडत आहेत. दरम्यान, आता भाजपकडून एक वेगळी बातमी समोर येत आहे. भाजपाचे आषिश शेलार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त एक सांस्कृतिक कार्यक्रम भाजपाने ठरवला आहे. कोरोनानंतर भाजपने एवढा मोठा सोहळा करायचा योजला आहे. यासाठी हजारो कार्यकर्ते सोमय्या ग्राऊंडवर येणार आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी आता राज्यातील नेत्यांनी योगीचा क्लास लावावा असा टोलाही लगावला आहे.

MLA Ashish Shelar
भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत राऊतांचं महत्वाचं वक्तव्य

कोरोनानंतर भाजपाचा असा एकही सोहळा झालेला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मेच्या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा होणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार आहे. मेट्रोच्या कामाच्या लपत दगड मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच पोलखोलमधून आम्ही ज्यांची लक्तरे घेतो त्यांचा आढावा घेणार आहोत. कुणी 14 मे ला सभा घेणार आहेत कुणी 1 मे ला सभा घेत आहेत या सर्वांना कडकडीत डोस दिला जाईल, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com