esakal | 'भाजपला वाटते राज्याचे नेतृत्व शरद पवारांनी करावे'
sakal

बोलून बातमी शोधा

navneet rana kaur criticism on shiv sena in lok sabha

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची केलेली स्तुती म्हणजे राज्यातील बदलते राजकीय समीकरण आहे. भारतीय जनता पक्षालाच शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व करावे असे वाटत असल्याचे मत खासदार नवनीत राणा कौर यांनी व्यक्त केले आहे.

'भाजपला वाटते राज्याचे नेतृत्व शरद पवारांनी करावे'

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची केलेली स्तुती म्हणजे राज्यातील बदलते राजकीय समीकरण आहे. भारतीय जनता पक्षालाच शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्व करावे असे वाटत असल्याचे मत खासदार नवनीत राणा कौर यांनी व्यक्त केले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नवनीत राणा कौर म्हणाल्या की, 'काँग्रेस राष्ट्रवादीच्या कितीही बैठका झाल्या तरी त्यांची खिचडी शिजणार नाही'. तसेच, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यासाठी शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी लोकसभेत बोलताना केला आहे.

मटणात सुद्धा म्हणे एक, दोन, तीन ग्रेड...

लोकसभेत शिवसेनवर टीका करताना नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या खासदारांनी शेतकऱ्यांसाठी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. पण, आपल्या स्वार्थासाठी, आपल्या लालचेसाठी, आपल्या पोस्टसाठी शिवसेना महाराष्ट्रात सरकार स्थापन करत नाही. जनतेनं मताधिक्य दिल्यानंतरही शिवसेना युतीतून बाहेर का पडली, असा प्रश्न केला आहे. स्वत:चा स्वार्थ आणि स्वत:च घर भरण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी शिवसेनेनं सत्ता स्थापन करायला हवी होती. आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांना मदत करायची भावना असल्यास मी स्वत:च घरही जाळायला तयार आहे. पण, शिवसेना सत्ता स्थापनेपासून दूर केली, असे राणा यांनी म्हटले.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची कबूली; मुख्यमंत्री पदाचा शिवसेनेला दिला होता शब्द

मी जिल्ह्यातील तालुक्यात फिरुन, फिरुन पाहिलंय. शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, मुग आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. पण, आज आमच्या राज्याला माय-बाप कुणीच नाही. त्यामुळे, केंद्र सरकारच आमचं मायबाप असून केंद्राने आम्हाला 50 हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी नवनीत राणा कौर यांनी केली. नवनीत कौर यांनी शिवसेनेवर टीका केल्यानंतर सभागृहात त्यांना विरोध करण्यात आला होता. मात्र, मी आज थांबणार नाही, आज कुणीही माझा आवाज बंद करू शकणार नाही. मी माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं सांगणारच, असे म्हणत कौर यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली.

loading image