esakal | 'पाऊस मुख्यमंत्र्यांनाही घेऊन गेला'; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन'ची चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

राज्यात नव्याने उदयास येत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाशिवआघाडीच्या नेत्यांच्या चर्चा सुरु आहेत. किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर समितीतील नेत्यांची बैठक घेतली. यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. आज ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा 'मी पुन्हा येईन'वरील चर्चेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

'पाऊस मुख्यमंत्र्यांनाही घेऊन गेला'; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन'ची चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोशल मीडियामध्ये 'मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून जोरदार मिम्स व्हायरल होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीतही यावर चर्चा झाल्याचे एका वायरल व्हिडिओत दिसून आले. या बैठकीचा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सोशल मीडियावरील मॅसेज एकमेकांना वाचून दाखविण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात नव्याने उदयास येत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाशिवआघाडीच्या नेत्यांच्या चर्चा सुरु आहेत. किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात येत आहे. त्यापूर्वी शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या कोअर समितीतील नेत्यांची बैठक घेतली. यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. आज ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या नेत्यांचा 'मी पुन्हा येईन'वरील चर्चेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पर्याय सर्वपक्षीय संयुक्त सरकारचा 

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, छगन भुजबळ , धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख असे दिग्गज नेते उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकीत सर्वांत व्हायरल झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन या घोषणेबाबत सर्वांनी चर्चा केली. या घोषणेचा सोशल मीडियात प्रचंड धूमाकूळ असून, मी पुन्हा येईन या वाक्याची चर्चा, मीम्स, जोक्स हे अनेक कार्यक्रमात वापरले जात आहे. बैठकीत छगन भुजबळ म्हणाले की, पाऊस थांबला हे बरं झालं, जाताना देवेंद्रना घेऊन गेला हे ही बरं झालं. त्यावर जितेंद्र आव्हाड सांगतात की, टीकटॉक किती येतायेत त्यावर. एक म्हातारा माणूस म्हणतो, मी पुन्हा येईन, त्यावर एक जण म्हणतो येताना जरा नवटाक घेऊन ये तर जयंत पाटील यांनी नवटाक नव्हे तर चुना चुना घेऊन ये अशी दुरुस्ती करतात. त्यावर धनंजय मुंडे यांनी तो डायलॉग भाऊ कदमचा आहे अशीही जोड दिल्याचे व्हिडिओत दिसून आले.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
https://www.esakal.com/mukhya-news
https://www.esakal.com/live-updates/marathi-breaking-news  
https://www.esakal.com/tajya-batmya/marathi-news

loading image
go to top