राफेल दानवेंच्या डोक्यापलिकडचा विषय : अशोक चव्हाण

ashok chavan
ashok chavan

​नाशिक : राफेल गैरव्यवहाराच्या आरोपावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर जहरी टीका केली आहे. चव्हाण म्हणाले, की राफेल हा विषय दानवेंच्या डोक्यापलिकडचा आहे.

राफेल गैरव्यवहाराचे आरोप करत काँग्रेसने देशभर भाजपला लक्ष्य केले आहे. यावर भाजपकडूनही काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे. दानवे यांनी काँग्रेसला लक्ष्य केल्यानंतर चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. 

चव्हाण म्हणाले, की रावसाहेब दानवेंचे मानसिक संतुलन बिघडलेले दिसत आहे. त्यामुळे अभ्यास नसताना ते बेताल वक्तव्य करत आहेत. राफेल दानवेच्या डोक्याच्या पलीकडचा विषय आहे. समजत नसलेल्या विषयावर का बोलता, राफेल की रायफल त्यांना समजत नाही.

दानवेना पेट्रोलचे अर्थकारण समजत नाही, काँग्रेसपेक्षा सध्याच्या भाजपच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम किंमती कमी झाल्या आहेत. पेट्रोल 100 पार करेल अशी स्थिती दिसत आहे, या भाववाढीचा परिणाम वाहतुकीमुळे इतर घटकांवर होत आहे. जीएसटी समितीमध्ये 90 टक्के भाजपचे अनेक राज्यातील अर्थमंत्री असून निर्णय कसा होत नाही. विरोधकांच्या सभा आणि यात्रांवर टीका करणाऱ्या दानवेनी जालनाकडे लक्ष द्यावे.

मनसे, एमआयएम सोडून आघाडीची तयारी
आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि एमआयएम पक्षांव्यतिरिक्त इतरांशी आघाडी करण्याची तयारी आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com