शिवसेनेनंतर भाजपचा मोर्चा काँग्रेसकडे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis & Ashok Chavhan

शिवसेनेनंतर भाजपचा मोर्चा काँग्रेसकडे!

मुंबई : शिवसेनेत फूट पाडल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता काँग्रेसकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय पक्षांतराची पुन्हा जोरदार चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.

गणपती दर्शनाच्या निमित्ताने फडणवीस व चव्हाण यांची वरळी येथील आशिष कुलकर्णी यांच्या घरी शुक्रवारी भेट झाली. हा योगायोग असल्याचे दावे करण्यात येत असले तरी शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण मतदानात सहभागी झाले नव्हते. तेव्हापासूनच काँग्रेसमध्ये बंडाळीचा डाव शिजत असल्याच्या चर्चा सुरू झाल्‍या. अशोक चव्हाण यांच्यासोबत तीन विधानसभा आणि दोन विधान परिषदचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच अशोक चव्हाण भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात, असा गौप्यस्फोट त्यांचे विरोधक प्रताप चिखलीकर यांनी केला. त्यावर तूर्तास असा काही निर्णय झाला नसल्याचा खुलासा चव्हाण यांनी केला.

विदर्भातील माजी मंत्रीही संपर्कात

राज्यातील सत्तांतरानंतर विदर्भातील काँग्रेसचे एक ज्येष्ठ माजी मंत्री आणि भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेता यांची भेट झाल्याचे समजते. पूर्व विदर्भातील हा नेता हमखास विधानसभा जिंकणारा नेता असून आघाडी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रिपदे भूषविली आहेत. याशिवाय विरोधी पक्षनेता म्हणूनही या नेत्याला संधी मिळाली होती.

अशोक चव्हाण यांच्यासह आम्ही सर्वचजण ‘भारत जोडो’ मोहिमेच्या नियोजनात सक्रिय आहोत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्याबद्दल सुरू असलेली चर्चा निराधार आहे.

- बाळासाहेब थोरात,नेते काँग्रेस

Web Title: Ashok Chavan Devendra Fadnavis Meeting Former Minister Of Vidarbha Also Touch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..