अपयशाबद्दल मी राजीनामा देण्यास तयार : अशोक चव्हाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

अशोक चव्हाण म्हणाले, की आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत असून त्यांनी राजीनामा देऊ नये. माझ्यासह अनेक राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत. पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.

मुंबई : ज्या राज्यात आम्हाला अपयश आले आहे, तेथील प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा द्यावा. मी सुद्धा राजीनामा देण्यास तयार आहे, पण राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.

काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज (शनिवार) दिल्लीत होत आहे. या बैठकीत राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण, कार्यकारिणीने तो फेटाळला आहे. मात्र, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी राहुल गांधी असा कोणताही प्रस्ताव ठेवलेला नसल्याचे म्हटले आहे. याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, की आम्ही राहुल गांधी यांच्यासोबत असून त्यांनी राजीनामा देऊ नये. माझ्यासह अनेक राज्यातील प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास तयार आहेत. पक्षश्रेष्टी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashok Chavan offers to resign as congress state president post