
- काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद नाही
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठक आयोजित करण्यात करण्यात आली होती. मात्र, आता ही बैठक रद्द झाली आहे. त्यावर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले, की ''बैठकीबाबत अद्याप कोणताही निरोप आम्हाला आला नाही. काँग्रेसची बैठक संपली असून, आता राष्ट्रवादीच्या निरोपाची प्रतीक्षा आहे''.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
काँग्रेसच्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक नियोजित होती. मात्र, त्या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप निरोप आला नाही. आमच्याकडे तशी माहिती नाही. काँग्रेसमधील चर्चा ही प्राथमिक चर्चा होती. राष्ट्रवादीसोबतच्या बैठकीसाठी नियोजन होते. पण त्यानंतर चर्चा झालेली नाही. आता राष्ट्रवादीच्या निरोपाची प्रतिक्षा आहे, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.
Video: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद नाही
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. बैठकीसाठी चर्चा करणार होतो. पण निरोप अद्याप आला नाही. त्यामुळे चर्चा होऊ शकली नाही. दोन्ही पक्षात चांगला समन्वय आहे. चर्चा आज किंवा उद्या कधीही होऊ शकते, असे चव्हाण म्हणाले.