esakal | जेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या प्रयोगाची दखल खुद्द शरद पवार घेतात....
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Gavhane Write about Gopinath munde and his Contribution to the field of cooperation
  • सहकार क्षेत्रातील 'मुंडे पॅटर्न'
  • वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना 

जेव्हा गोपीनाथ मुंडेंच्या प्रयोगाची दखल खुद्द शरद पवार घेतात....

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

१२ डिसेंबर म्हटलं की राजकारणातले दोन चेहरे हमखास समोर येतात, ते म्हणजे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार. दोघांनीही महाराष्ट्राच्या राजकारणात अणि समाजकारणात आणि सहकार क्षेत्रात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. आज (ता.१२ डिसेंबर) दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. त्यांनी सहकार क्षेत्रात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. मुंडेनी उभा केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने केलेल्या नवनवीन प्रयोगाची दखल सहकार क्षेत्र आणि साखर कारखान्याचे जाणकार खुद्द शरद पवार यांनीही घेतली होती. राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कारखान्याची दखल घेणे म्हणजे त्यांच्यासाठी मोठा सन्मान होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

सहकार क्षेत्रातील मुंडे पॅटर्न पाहायला गेल्यास तो वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यापासून सुरु होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्याचा झालेला विकास हा सहकार क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सहकाराच्या माध्यमातून राज्यात अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. मात्र १९८०-९० च्या दशकात सहकार क्षेत्रात सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा मोठा दबदबा होता आणि विरोधी पक्षात असलेल्या गोपीनाथरावांना ही गोष्ट कायम खटकत राहिली. यातूनच त्यांनी साखर कारखाना उभारण्याचा निर्धार केला.

मोबाईल नंबर पोर्ट करायचाय? आता 'हे' आहेत नवीन नियम..

परळी वैजनाथ येथे सहकारी साखर कारखान्यासाठी काही कारणांमुळे मंजुरी मिळत नव्हती. १९९५ ला युती सरकार सत्तेत आल्यावर गोपीनाथराव उपमुख्यमंत्री होऊनही साखर आयुक्तांनी कारखान्याला परवानगी नाकारली. त्यांनंतर मुंडेनी स्वतः लक्ष घालत काही तांत्रिक बाबी स्वतः साखर आयुक्तांना समजावून सांगितल्या, त्यावेळी साखर आयुक्तांनी कारखान्याच्या उभारण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. साखर आयुक्तांच्या म्हणण्याप्रमाणे त्यावेळी ३६ कोटी रुपयांमध्ये अडीच हजार गाळपाची क्षमता असलेला कारखाना उभा करणे शक्य नाही. परंतु मुंडे आणि सहकाऱ्यांनी ३६ कोटी रुपयांमध्ये उभा करून दाखवला. उभारणीच्या काळात खर्चाची रक्कम कमी झाल्याने कर्जाचा बोजाही कमी झाला. पुढे या कारखान्याने अनेक विक्रम केलेले आपल्याला पाहायला मिळाले.

या मंत्र्यांना मिळणार 'हे' खातं ; अखेर खातेवाटप जाहीर..

इथेनॉल निर्मीतीचा सहप्रल्प उभा करून वैद्यनाथच्या प्रगतीत मुंडेनी आणखी एक मानाचा तुरा रोवला.  हा प्रकल्पही त्यांनी प्रस्थापित निकषांपेक्षा कमी पैशात उभा करून दाखवण्याशिवाय उसापासूनच नव्हे तर अन्य पिकांपासूनही इथेनॉलची निर्मीती करून दाखवली. अनेक राजकीय नेत्यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाची बांधणी केलेली पाहायला मिळाली परंतु, मुंडेनी याऊलट केले. त्यांनी आधी मतदारसंघाची व्यवस्थित बांधणी केली आणि त्यानंतर त्यांनी मतदारसंघात कारखान्याची उभारणी केली. महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याची मुहुर्तमेढ नगर जिल्ह्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी धनंजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोवली होती. वैद्यनाथ कारखाना मुंडेनी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात उभारून विखे पाटलांना आदरांजलीच वाहिली होती.

शरद पवारांच्या आई शारदाबाईही होत्या लढवय्या; वाचा त्यांचा जीवनप्रवास

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आणि शिवसेना भाजप युतीतील नेत्यांनीच नव्हे तर अनेक काँग्रेस नेत्यांनीही मुंडेंच्या पावलावर पाऊल टाकत आपले कारखाने उभे केले. वैद्यनाथ कारखान्याचा वैद्यनाथ पॅटर्न प्रचलित झाला आणि सहकार क्षेत्राला मुंडे पॅटर्न कळाला.


संदर्भ : लोकनेता गोपीनाथ मुंडे (लेखक : पंकजा मुंडे)