

Authorities intensify investigation in the Ashok Kharat case as administrative officer Abhijit Bhande Patil faces action over alleged land partnership links.
esakal
शेकडो महिलांचे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि अघोरी कृत्यांचे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय नेत्यांनंतर प्रशासकीय अधिकारी कारवाई सुरू झाली आहे. या प्रकरणात खरात सोबत जमिनीत भागीदारी असल्याच्या कारणावरुन मुंबईत उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती तत्काळ संपुष्टात आणून त्यांची मंत्रालयात बदली करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. ही प्रकरणातील पहिली प्रमुख शासकीय अधिकाऱ्याविरुद्धची कारवाई मानली जात आहे.