चित्रकला स्पर्धेसाठी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेश

Drawing-Competition
Drawing-Competition

पुणे - येत्या रविवारी (ता. १२) महाराष्ट्र व गोव्यात एकाच वेळी होणाऱ्या ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये विशेष विद्यार्थ्यांना आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विनाशुल्क सहभागी होता येणार आहे.

विशेष विद्यार्थ्यांनी आणि आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा कूपन सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. विशेष मुलांमधील उपजत कलागुणांना यामुळे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच, स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांसाठीही ‘सकाळ’ने विशेष सवलत दिली आहे. गुरुवारच्या अंकात (ता.९) किंवा यापूर्वी ता. ३, ५ आणि ७ जानेवारी रोजी ‘सकाळ’च्या अंकात प्रसिद्ध झालेले विशेष कूपन पूर्ण भरून स्पर्धा केंद्रावर देणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत विनामूल्य सहभागी होता येणार आहे. 

स्पर्धेचे विशेष कूपन भरू न शकणाऱ्या स्पर्धकांना http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन दहा रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. पूर्ण भरलेले विशेष कूपन किंवा प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन मिळालेली पोच संयोजकांकडे देणे अनिवार्य असणार आहे, याची कृपया स्पर्धक विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी नोंद घ्यावी. यापूर्वी प्रवेश शुल्क भरलेल्या स्पर्धकांशी ‘सकाळ’च्या वतीने लवकरच संपर्क साधला जाईल. 

महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाची नोंद घेत गेल्या वर्षी ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. स्पर्धेचे हे ३४ वे वर्ष आहे. 

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवीत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’ हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

दरवर्षीप्रमाणे चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्या बरोबर आणावयाचे आहे. स्पर्धा केंद्रांची विभागवार यादी सकाळच्या अंकातून प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील केंद्रावर थेट उपस्थित राहून सहभाग नोंदवावा. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. 

असे व्हा सहभागी
पर्याय-१

 तुमचा गट निश्‍चित करा. 
 ‘सकाळ’च्या ता. ३, ५, किंवा ७ जानेवारी रोजीच्या किंवा गुरुवारच्या (ता. ९) अंकातील ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’ विषयीचे कूपन कापून ते पूर्ण भरा. 
 भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा 
 रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर पूर्ण भरलेले विशेष कूपन देऊन स्पर्धेत सहभागी व्हा. 

पर्याय-२
 विशेष कूपन भरू न शकल्यास 
    http://bit.ly/2sAmK1H या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येकी रु. १० प्रवेश शुल्क भरून नोंदणी करा. ऑनलाइन नोंदणी केल्यावर शुल्क भरल्याबाबतचा एसएमएस स्पर्धा संपेपर्यंत जपून ठेवा; किंवा 
 मोबाईल फोनवर हा क्‍यूआर कोड स्कॅन करून नावनोंदणी व शुल्क भरून सहभाग निश्‍चित करा. 
 रविवार, ता. १२ रोजी आपल्या घराजवळच्या स्पर्धा केंद्रावर प्रवेश शुल्क भरल्याची ऑनलाइन पोच दाखवून स्पर्धेत सहभागी व्हा.

‘‘सकाळ चित्रकला स्पर्धा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली कलासंस्कृतीची चळवळ आहे. पु. ना. गाडगीळ आणि सन्स कायमच आधुनिक व पारंपरिक कलागुणांना वाढविण्यासाठी तत्पर असतात. यातील एक भाग म्हणजे पु. ना. गाडगीळ आणि सन्सने उपलब्ध केलेली नवोदित कलाकारांसाठीची आठ कलादालने. आमच्या संस्थेतर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व बालचित्रकारांना खूप-खूप शुभेच्छा.’’
- अजित गाडगीळ, अध्यक्ष-संचालक, पु. ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड

‘‘तंत्रज्ञानामुळे सुपरफास्ट झालेल्या युगात विद्यार्थी मोबाईल, इंटरनेट, टी. व्ही. संच यामध्ये अडकलेले दिसतात. सकाळ आयोजित चित्रकला स्पर्धेमुळे मुलांच्या उपजत कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे. स्पर्धेत विशेष आणि अनाथाश्रमातील मुलांचा सहभाग असल्यामुळे त्यांचीही वेगवेगळेपणाची भावना यानिमित्त कमी होईल. स्पर्धेच्या आयोजनात सहभागी होताना ‘लोकमान्य’ला समाधान वाटत आहे.’’
- सुशील जाधव, झोनल मॅनेजर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com