Assembly Winter Session : अनिल देशमुख बाहेर येणार? हिवाळी अधिवेशनाला राहू शकतात उपस्थित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

assembly winter session 2022 NCP leader anil Deshmukh may join winter session in Nagpur nawab malik

Assembly Winter Session : अनिल देशमुख बाहेर येणार? हिवाळी अधिवेशनाला राहू शकतात उपस्थित

Maharashtra Assembly Winter Session 2022 : उद्यापासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. महाविकास अघाडीकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त विधान तसेच राज्यातून बाहेर गेलेले उद्योग आणि पेटलेला सीमाप्रश्न या पार्श्वभूमिवर चांगलेच गाजणार असं दिसतंय. उद्या सुरू होणाऱ्या अधिवेशनाला अनिल देशमुख देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

उद्या सुरु होत असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठीच्या राष्ट्रवादीच्या बैठक व्यवस्था यादीमध्ये अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची नावे असल्याचे समोर आल्याने हे नेते देखील अधिवेशनाला हजेरी लावणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अनिल देशमुख यांच्या जामीन स्थगितीच्या याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता आहे. यादरम्यान राष्ट्रवादीच्या बैठक व्यवस्थेत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा: Ajit Pawar : विरोधकांचा सरकारी चहापानावर बहिष्कार, अजित पवारांनी सांगितलं कारण; म्हणाले..

राष्ट्रवादीच्या बैठक व्यवस्था यादीत सर्व महत्वाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये देशमुख आणि मलिक यांना शेवटची आसने देण्यात आली आहेत. मात्र या दोन नेत्याची नावे देण्यात आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सीबीआयच्या याचिकेवरून देशमुखांच्या जामीनाला स्थगिती मिळाली नाही तर अनिल देशमुख अधिवेशनाला हजेरी लावू शकतात.

हेही वाचा: प्रेमाचा करुण अंत! लोखंड कापयच्या यंत्रांनं पत्नीचे पन्नास तुकडे; पोलिसांनी सांगितलं कारण

दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला आज विरोधकांची बैठक देखील पार पडली. विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. दरम्यान या अधिवेशनात राज्य सरकार ११ विधेयके मांडण्याची शक्यता असून हे अधिवेशन ३० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. राज्य सरकारने या विधेयकांवर चर्चेसाठी पुरेसा वेळ द्यावा, घाईगडबडीत मंजूर करू नये, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.