leopard
sakal
महाराष्ट्र बातम्या
Leopard Issue : बिबट प्रश्नी पाच दिवसांत उपाययोजना; नाईक, बावनकुळे यांची विधानसभेत ग्वाही
राज्यातील अनेक भागात बिबट्याची दहशत आहे. पुणे, सिन्नर, अहिल्यानगरासह नागपुरातही बिबट्यांमुळे भीतीचे वातावरण आहे.
नागपूर - राज्यातील अनेक भागात बिबट्याची दहशत आहे. पुणे, सिन्नर, अहिल्यानगरासह नागपुरातही बिबट्यांमुळे भीतीचे वातावरण आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जेरबंदी आणि नसबंदी असे उपाय केले जात आहेत, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली. तर हा प्रश्न विविध विभागात असल्याने विभागनिहाय बैठका घेत पाच दिवसांत उपाययोजना करण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
