मुंबई - ‘देशाचे चित्र गंभीर असून लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांवर संकट, त्यांच्यावर हल्ला या गोष्टी दैनंदिन झाल्या आहेत. पुरोगामी विचारांच्या नेत्यांना खोट्या कारणांनी अटक करून तुरुंगात टाकले जात असून प्रतिगामी शक्तींची देश आणि राज्य चालविण्यात घुसखोरी सुरू आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.