आर्थिक मागास विद्यार्थ्यांना सवलती द्याव्यात - सुळे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद -  ""शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही केवळ ऐपत नसल्याने जर कुणी शिक्षणापासून वंचित राहत असेल तर अशा विद्यार्थ्यांना सवलती मिळायलाच हव्यात. तसेच, मराठा, मुस्लिम यांच्यासह धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्‍त केले. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित "जागर हा जाणिवांचा' कार्यक्रमानंतर त्या पत्रकारांशी बोल होत्या. सुळे म्हणाल्या, ""महाराष्ट्राचे सामाजिक स्थान महत्त्वाचे आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक परिवर्तन, स्वच्छता अभियान, मनरेगा अशा विविध बाबींमध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र, आज आपण मागे पडत आहोत. गुजरात, कर्नाटकमध्ये सुरळीत वीजपुरवठा असताना महाराष्ट्रातच भारनियमन कशासाठी? दोन महिने पुरेल एवढा कोळसा असल्याचे सांगितले असताना अचानक कोळशाअभावी भारनियमन कसे होऊ शकते, याचा आपण शोध घेत आहोत.''

Web Title: aurangabad news supriya sule student