निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले...(व्हिडिओ)

वृत्तसंस्था
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रात मोठ्या उत्सवाची घोषणा निवडणुकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मतदानासाठी अधिकाधिक लोकांनी जावे आणि आपला हक्क बजावावा.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र.

मुंबई : महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, की महाराष्ट्रात मोठ्या उत्सवाची घोषणा निवडणुकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मतदानासाठी अधिकाधिक लोकांनी जावे आणि आपला हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज (शनिवार) निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार राज्यात निवडणूक कार्यक्रम पार पडेल. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आयोगाकडून आज निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. मी त्याचे स्वागत करतो. राज्यातील जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून आपला हक्क बजावावा. तसेच महाराष्ट्रातील जनतेला मी आवाहन करतो, की लोकशाहीच्या महोत्सवात त्यांनी यावे. जी लोक सरकारकडून अपेक्षा करतात किंवा त्यांच्या निर्णयावर कधी टीकाही करतात. अशा लोकांना मतदानाचा अधिकार आहे. त्यांनी तो बजावावा.

तसेच ते पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाने सूचना केल्याप्रमाणे आपण कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करावा. त्यासाठी इतर राजकीय पक्षही यावर विचार करून त्याबाबत अमलात आणेल, अशी मला आशा आहे.

Vidhan Sabha 2019:दिवाळीत फुटणार निवडणुकांचे फटाके; 'या' आहेत तारखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Avail your right do voting appeal by CM Fadnavis Maharashtra Vidhan Sabha 2019