Vidhan Sabha 2019:दिवाळीत फुटणार निवडणुकांचे फटाके; 'या' आहेत तारखा

टीम ई-सकाळ
Saturday, 21 September 2019

देशभरात उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची आज घोषणा झाली. महाराष्ट्रासोबतच हरियानातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील आणि हरियानातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज झाली. महाराष्ट्रात २८८ जागांवर ही निवडणूक होणार आहे. हरियानात ९० जागांसाठी निवडणूक होत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी आज, महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत २१ ऑक्टोबरला मतदार होणार असून, २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

अजित पवार यांच्या भावासह इतर अडचणीत

महाराष्ट्रात असे आहेत मतदारसंघ

  1. एकूण मतदारसंघ - २८८
  2. नुसूचित जाती - २९
  3. अनुसूचित जमाती - २५ 

असा असेल निवडणूक कार्यक्रम

  1. अर्ज भरण्याची मुदत – ४ ऑक्टोबर 
  2. अर्ज मागे घेण्याची मुदत – ७ ऑक्टोबर
  3. अर्जांची छाननी – ५ ऑक्टोबर 
  4. मतदान - २१ ऑक्टोबर
  5. निवडणूक निकाल – २४ ऑक्टोबर

भाजपमध्ये जाणारे तीन आमदार वेटिंगवर 
निवडणूक होणार रंगतदार
देशात लोकसभेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात विधानसभा निवडणुकांकडे सगळ्यांचे डोळे लागले होते. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली होती. मतदारसंघांची चाचपणी, उमेदवारांची निवड यात राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते गुंतले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर, शिवसेना-भाजप युतीचे घोडे जागा वाटपात अडले आहे. युती झालीच तर, वंचित बहुजन आघाडी हा तिसरा भिडू निवडणूक रिंगणात असेल आणि युती फुटलीच तर निवडणूक आणखी रंगतदार होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 election commission announcement Maharashtra Haryana