मातोश्रीवरील भेटींबाबत अवधूत तटकरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

अवधून तटकरे यांनी म्हटले आहे  की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेली भेट ही सदिच्छा भेट हाती, कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेना प्रेवशाबात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, काका सुनील तटकरे यांच्याविषयी काही माहित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा ही राजकीय चर्चा होती, असेही ते म्हणाले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या बाबतीत त्यांचा पुतण्या अवधूत तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सुनील तटकरे, अवधूत तटकरे आणि भाऊ अनिल तटकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

अवधून तटकरे यांनी म्हटले आहे  की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेली भेट ही सदिच्छा भेट हाती, कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेना प्रेवशाबात निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, काका सुनील तटकरे यांच्याविषयी काही माहित नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा ही राजकीय चर्चा होती, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, आज सुनील तटकरे, अवधूनत तटकरे आणि अनिल तटकरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्याने ते शिवसेनेमध्ये लवकरच प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awdhoot tatkare clarifies about Matoshree visit