

Baba Adhav last moments
esakal
Pune Latest News: ‘सत्य सर्वांचे आदी घर सर्व धर्मांचे माहेर, जगामाजी सुख सारे खास सत्याची ती पोरे, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार हे अखंड काव्य थोर समाजसुधारक महात्मा फुले यांनी रचले असून त्याद्वारे जातीभेद, धर्म आणि वर्ग यावर आधारित भेदभावांना आव्हान देऊन त्यांनी एकतेचा संदेश दिला.
हाच अखंड पुढे डॉ. बाबा आढाव यांनी केवळ अंगीकारला नव्हे तर त्यांच्या अंगी भिनला. सभेची सुरुवात ते या ‘अखंडा’ने करत असत हे सर्वश्रुत आहे. परंतु, ज्यावेळी बाबा रुग्णालयात शेवटची घटका मोजत होते, त्यावेळी देखील त्यांनी अखंड म्हटला. यावरून बाबांचा शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे ‘अखंडा’ वर किती निष्ठा, प्रेम होते हे दिसून येते.