
रविवारी मिहान येथे होणाऱ्या पतंजली फूड अँड हर्बल पार्कच्या भव्य उद्घाटन समारंभाच्या आधी योगगुरू बाबा रामदेव शनिवारी नागपुरात दाखल झाले. महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या थडग्याभोवती सुरू असलेल्या वादावर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपले मत मांडले. यात त्यांनी मुस्लीम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.