'स्वतंत्र मराठवाडा'च्या मागणीवर अजित पवारांचं भाष्य; म्हणाले...: Ajit Pawar on Marathwada | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar on Marathwada: 'स्वतंत्र मराठवाडा'च्या मागणीवर अजित पवारांचं भाष्य; म्हणाले...

पुणे : स्वतंत्र विदर्भाप्रमाणं आता स्वतंत्र मराठवाड्याची मागणी सुरु झालीए. यावर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोण ही मागणी करतंय? असं खोचकपणे विचारत त्यांनी टीका केली आहे. (Ajit Pawar spoke on demand of Separation of Marathwada)

हेही वाचा: Marathwada : मी दुधखुळा नाही, डॉक्टरेट आहे; स्वतंत्र मराठवाड्याबाबत गुणरत्न सदावर्तेंची भूमिका

अजित पवारांना जेव्हा स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, "हे कोण बोलत हे बघा. ज्याच्याकडे काही अधिकार नाहीत ते अशी मागणी करत आहेत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं?"

हेही वाचा: Ramdev Baba: रामदेवबाबांनी केली हाईट, महिलांच्या सलवारबाबत केलं भलतंच विधान

सदावर्तेंच्या अध्यक्षतेखाली होणार परिषद

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद जिल्ह्यात 'संवाद परिषदे'चे आयोजन करण्यात आलं आहे. याचं पोस्टर राज्यातील विविध भागात लावण्यात आली आहेत. 'स्वतंत्र मराठवाडा' राज्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सीमाप्रश्नावरही केलं भाष्य

राज्य सरकारनं जत पंढरपूरकडं लक्ष दिलं पाहिजे. तिथल्या लोकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. तिथल्या लोकांना आपलेपणाची वागणूक मिळेल यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांनी याकडं लक्ष दिलं पाहिजं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कडक उत्तर दिले पाहिजे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडं महाराष्ट्राची एक इंच पण जागा येईल असा विचार मनामध्ये आणू नये. बेळगाव, निपाणी या गावांचे विषय कोर्टात आहेत. सरकारने हा भाग महाराष्ट्रात कसा येईल हे बघायला पाहिजे, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.