
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी धक्कादायक असं विधान केलंय. अंगावरचे कपडे, पायातले बुट आणि चप्पल सरकारमुळेच आहे असं विधान लोणीकर यांनी केल्यानं नवा वाद निर्माण झालाय. सोशल मीडियावर सरकार आणि नेत्यांविरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणांबाबत बोलताना लोणीकर यांची जीभ घसरली. बबनराव लोणीकर यांच्या विधानाची चर्चा आता होत असून त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. जालन्यात एका कार्यक्रमातील भाषणात त्यांनी हे विधान केलंय.