Bacchu Kadu: बच्चू कडूंचं ठरलंय! सरकारमध्ये रहायचं की नाही? काही तासांतच जाहीर करणार भूमिका

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यानं सध्या इच्छुक आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
Bacchu Kadu News
Bacchu Kadu Newsesakal

अमरावती : राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या समावेशामुळं शिवेसना आणि अपक्ष आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आजच मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगितलं जात आहे, पण त्याला मुहूर्त काही लागत नाहीए. त्यामुळं आता मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांच्या सहनशक्तीचा विस्फोट होईल अशी चिन्ह आहेत.

अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील सरकारमध्ये रहायचं की नाही याबाबत आपण सकाळी ११ वाजता भूमिका जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं त्यांना भूमिकेकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Bacchu Kadu displeased about not getting ministerial post will be announced role in a few hours)

Bacchu Kadu News
Deepak Kesarkar : '..तर दीपक केसरकर भाजपमध्ये जातील'; ठाकरे गटाच्या प्रवक्त्याचा मोठा गौप्यस्फोट

एका वृत्तवाहिनीशी बोलताना कडू म्हणाले, मला फोन आलेला आहे. मी याबाबत सकाळी अकरा वाजता मंत्रिमंडळात सामिल व्हायचं की नाही व्हायचं हे जाहीर करणार आहे. बच्चू कडू आणि प्रहार म्हणून आमची भूमिका काय असेल हे आम्ही जाहीर करणार आहोत. (Latest Marathi News)

Bacchu Kadu News
PM Modi France Visit : पंतप्रधान मोदी फ्रान्सला रवाना; बॅस्टिल डे परेडला राहणार उपस्थित, विविध करारांची शक्यता

अमरावतीत बैठक

बच्चू कडू सध्या अमरावतीत असून त्यांच्या मतदारसंघातील कुरळपूर्ण इथं सकाळी अकरा वाजता प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर आपण कशासाठी राजकारण करायचं. कोणासाठी धावलं पाहिजे, कशा पद्धतीनं पुढं गेलं पाहिजे याबाबतची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.

Bacchu Kadu News
N Chandrasekaran : टाटांच्या अध्यक्षांनी बनवला महाराष्ट्राच्या प्रगतीचा रोडमॅप, अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कशामुळं रखडलाय याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले याबाबत शिंदे-फडणवीसच सांगू शकतील. माझं नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेच, सरकारकडून अपक्षांना स्थान दिलं जात आहे. पण अजितदादा दिल्लीला गेले याचं मला देणंघेणं नाही. (Marathi Tajya Batmya)

Bacchu Kadu News
Kolhapur Politics : शिवसेना, राष्ट्रवादीमधील फूट कुणाच्या पथ्यावर? 'या' नेत्यांची भूमिका ठरणार निर्णायक

दरम्यान, शिंदेंच्या बंडानंतर त्यांच्यासोबत गुवाहाटीला जाणाऱ्या पहिल्या आमदारांमध्ये बच्चू कडू हे देखील होते. कडू हे चार वेळा आमदार राहिले आहेत. या मंत्रिमंडळात आपल्याला मंत्रिपद मिळेल याची त्यांना आशा आहे. पण अद्यात ते मिळू शकलेलं नाही. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं होतं की, फोन आला की लगेच मुंबईसाठी निघतो. तसंच कडू यांनी देखील आपल्याला फोन आल्याचं म्हटलंय पण त्यांनी मुंबईला न जाता अमरावतीतूनच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com