Ajit Pawar: 'अजितदादांची आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ सहन करणार नाही', बच्चू कडूंचा सूचक इशारा

आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ सहन करणार नाही म्हणत बच्चू कडूंचा अजित पवारांना सूचक इशारा
Ajit Pawar:
Ajit Pawar:Esakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या जवळच्या ८ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. अजित पवार निधी देत नव्हते, म्हणून आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असा दावा शिंदे गटातील आमदारांनी केला होता. आता अजित पवारच सरकारमध्ये सामील झाल्याने शिंदे गटातील आमदारांची कोंडी झाली आहे. तर याबाबत सातत्याने काही आमदार नाराजी व्यक्त करत आहेत. (Latest Marathi News)

तर नव्याने शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह इतरांचं खातेवाटप अद्याप झालेलं नाही. शपथविधीला दहा दिवस उलटूनही खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. याचदरम्यान, माजी मंत्री बच्चू कडू यांनी तीन इंजिनचे सरकार कधीही कोसळू शकतं, असं मोठं वक्तव्य केलं आहे.

Ajit Pawar:
Ajit Pawar Latest Update : '…तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री होतील', भाजपाच्या माजी खासदाराचं वक्तव्य

बच्चू कडू यांनी बोलताना म्हंटलं कि, 'तीन इंजिनचे सरकार मजबूतही राहू शकतं किंवा कधीही कोसळू शकत असं ते म्हणालेत. तर अजितदादांची आमच्या मतदारसंघात ढवळाढवळ सहन करणार नाही असं म्हणत बच्चू कडूंनी सूचक इशारा दिला आहे.(Latest Marathi News)

तर, 'तीन इंजिनमुळे बिघाड होऊ नये म्हणून मुंबईत बैठका सुरू असतील. या सगळ्या अचानक झालेल्या घटना आहेत. यात नकळतपणे अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे त्यात थोडा चिंतेचा विषय आहेच. कुणाला कोणतं खातं द्यायचं, कोणत्या जिल्ह्याला कुणाला पालकमंत्री करायचं या अनेक भानगडी आहेत. दिसताना सोपं वाटतं, पण आतून आम्ही पाहतो तेव्हा सर्व पोखरलेलं असतं,' असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं आहे.

बच्चू कडू आणखी काय म्हणालेत?

'मला कुठल्याही पालकमंत्रिपदाची अपेक्षा नाही. मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही फोन नाही. आमदारांची नाराजी होणारंच शेवटी पद आहे. सगळीकडे आनंद नाही, विरोधी पक्षातही नाही. सत्ताधारी पक्षातही नाही. अर्थखातं अजितदादांकडे जाऊ नये, अशी अनेक आमदारांची मागणी आहे. अजित पवारांना अर्थखातं देण्यालाही काहींचा विरोध आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आमदारांची नाराजी दूर करणे मोठं आव्हान असेल. कारण त्यातून नाराजीचा सूर उमटेल, असेही बच्चू कडू पुढे म्हणाले.(Latest Marathi News)

'बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. पण तिसरा आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रिपदे गेली आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या हातातला घास खाणारा राष्ट्रवादी पक्ष येथेही आला आहे. त्यामुळे ही नाराजी असणार आहे. आमच्या गटातील आमदारांना अजित पवार हे अर्थमंत्री नको आहे. त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री असताना निधीची पळवापळव केली म्हणून आम्ही इकडे आलो. त्यात अजित पवार यांची आमच्या मतदारसंघात बिलकुल ढळाढवळ बिलकुल सहन करणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

Ajit Pawar:
Marathi News Update: मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा ते अजित पवारांचा दिल्ली दौरा, दिवसभरातील अपडेट वाचा

तर काल (मंगळवारी) अजित पवार अनेक आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यामुळे आमदार बच्चू कडू नाराज आहेत, या चर्चांवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि, “मी नाराज होत नाही. नाराज झालो तर वाटोळं केल्याशिवाय राहत नाही”, असं ते म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शिंदे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडला. राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे अनेकांची गोची झाल्याचं देखील बच्चू कडू म्हणाले आहेत. (Latest Marathi News)

Ajit Pawar:
Maharashtra Cabinet Expansion: खातेवाटप रखडलं, पण बंगले, दालनांचं झालं वाटप; राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना मिळाली निवासस्थानं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com