Nagpur Farmers Protest : बच्चू कडूंच्या नेतृत्वात हजारो शेतकरी नागपूरच्या वेशीवर धडकले, महामार्ग ठप्प; आज 'रेल्वे रोको'चा इशारा

Bachchu Kadu Protest : शेकडो ट्रॅक्टर आणि वाहनांसह शेतकऱ्यांनी महामार्गावर रात्री मुक्काम केला.बच्चू कडू यांनी सरकारला दुपारी १२ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.अल्टिमेटमनंतर मागण्या पूर्ण न झाल्यास रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Farmers under Bachchu Kadu’s leadership block Nagpur highways with tractors, demanding immediate loan waiver and fair MSP for cotton and soybean.

Farmers under Bachchu Kadu’s leadership block Nagpur highways with tractors, demanding immediate loan waiver and fair MSP for cotton and soybean.

esakal

Updated on

Summary

  1. बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा नागपूरच्या वेशीवर भव्य मोर्चा धडकला.

  2. शेतकरी कर्जमाफी आणि पिकांना योग्य भाव या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.

  3. आंदोलकांनी समृद्धी महामार्गासह जबलपूर, भंडारा आणि हैदराबादकडे जाणारे मार्ग ठप्प केले आहेत.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू, राजू शेट्टी आणि महादेव जानकर तसेच रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपूरच्या वेशीवर हजारो शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा धडकला आहे. आंदोलकांनी कालची रात्र जामठा येथे महामार्गावर काढली आहे.समृद्धी महामार्गासह जबलपूर,भंडारा आणि हैदराबादकडे जाणारे प्रमुख मार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरले आहेत.बच्चू कडू यांनी सरकारला आज दुपारपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा रेल रोको करु असल्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com